मु्ंबई: बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कांचन राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कांचन कूल या दौंडचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या पत्नी आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे भाजप याठिकाणी कोणता उमेदवार देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. कांचन कुल या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासाठी लोकसभेचा पेपर तुलनेत सोपा मानला जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये येऊ शकते - रामदास आठवले


गेल्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया यांच्याविरोधात रासपचे सर्वेसर्वा महादेव जानकर रिंगणात उतरले होते. त्यावेळी जानकर ८० हजार मतांनी पराभूत झाले होते. महादेव जानकर यांनी कपबशीच्या चिन्हावर दौंड, पुरंदर व खडकवासला मतदारसंघातून मोठी आघाडी घेतली होती. सुळे यांना बारामती, इंदापूर व भोर मतदारसंघांमध्ये मताधिक्य मिळाले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांचा कमी मताधिक्याने विजय झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी अधिक सावध आहे.