मुंबई : हिंमत असेल तर एकटे एकटे लढा असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला दिले.  भाजपाला निवडून द्यायच नाही हा एकच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचे पाटील म्हणाले. पदवीधर मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीत पराभव मिळाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी महाविकास आघाडीला चॅलेंज देतो हिंमत असेल तर एकटे एकटे लढा असे ते म्गणाले. आमच्या उमेदवारांचा जो पराभव झाला आहे त्याच आम्ही चिंतन करू असे सांगत प्रत्येक पक्षाची वोट बॅक असल्यामुळे आमचा पराभव झाल्याचे पाटील म्हणाले.


मित्र त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र पाहायला मिळालं असे म्हणतं त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला. शिवसेना सोबत असती तर बळ मिळालच असतं पण ते सोबत नाहीत. त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत असे ते म्हणाले. तसेच शिवसेनेला या निवडणुकीत अक्षरक्ष भोपळा मिळाला. मुख्यमंत्री असून त्यांना उमेदवार निवडतां येत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. 


मी विनोदी विधान करतो अस शरद पवार बोलतात त्यांना बोलू द्या.शक्यतो ते खालच्या पातळीची वक्तव्य कधीही करत नाही असे पाटील म्हणाले. 


अपेक्षेपक्षा वेगळे निकाल - फडणवीस 


भाजपच्या सगळ्या नेत्यांनी प्रचंड मेहनत केली, आमची स्ट्रॅटेजिक चूक कुठे झाली ? की तीन पक्ष एकत्र आल्यावर जे होते ते झालं ?  पुढच्या वेळी त्यावेळी याबाबत निश्चित विचार करू असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


पदवीधर बाबत नोंदणी करण्यात कमी पडलो असे त्यांनी सांगितले.ज्यांचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा एकही जागा आलेली नाही असा टोला त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेनेला लगवला. 



विनोदी विधाने करणं हा चंद्रकांत पाटलांचा लौकिक आहे. मागच्या वेळी विधान परिषदेला कसे निवडून आले हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विधानसभेला पुण्यातील सुरक्षित मतदार संघ निवडल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी लगावला. चंद्रकांत पाटलांना विश्वास असता तर त्यांनी मतदारसंघ बदलला नसताय त्यामुळे ते जे बोलतात त्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे पवार म्हणाले.