मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनीही फोन टॅपिंगच्या चौकशीची मागणी केली आहे. भाजप सरकारच्या काळात अशा घटना घडल्या असतील तर दुर्देव असल्याचं सुद्धा ते म्हणाले. पुढील काही महिने तरी महाराष्ट्रात निवडणूका लागणार नाहीत असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


दोन सदस्यीय समिती


याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी दोन सदस्यीय समिती नेमली आहे. या समितीत अतिरिक्त मुख्य सचिव श्रीकांत सिंग आणि पोलीस सहआयुक्त अमितेश कुमार या दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. फडणवीस सरकारच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला होता.