Eknath Khadse will meet Pankaja Munde : माजी मंत्री पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच त्या राष्ट्रवादीत जातील, अशीही चर्चा सुरु आहे. परंतु पंकजा मुंडे यांच्याकडून काहीही तसा दुजारो मिळालेला नाही. असे असताना त्यांची राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. पंकजा भाजपमध्ये नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांत राजकीय चर्चा होण्याची शक्यता आहे. 


'मी भाजपची असले, तरी भाजप माझा पक्ष नाही'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या असतानाच  एकनाथ खडसे आज त्यांची भेट घेणार असल्याने या भेटीची मोठी उत्सुकता आहे. दिल्लीत एका कार्यक्रमाच्यावेळी पंकजा मुंडे यांनी धक्कादायक विधान केले होते. 'मी भाजपची असले, तरी भाजप माझा पक्ष नाही' असे म्हटले होते. यावरुन पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पंकजा यांच्या विधानानंतर एकनाथ खडसे यांनी पंकजा यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आज एकनाथ खडसे  पंकजा यांची भेट होत आहे. त्यामुळे या भेटीवर तर्कवितर्क लावले जात आहेत. 'काही नाही मिळाले तर मी ऊस तोडायला जाईन'


खडसे आणि मुंडे यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार?


दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर मोठी गर्दी होते. या कार्यक्रमाला एकनाथ खडसे हे देखील जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खडसे आणि मुंडे यांच्या भेटीत राजकीय चर्चा होणार असल्याचे संकेत आहेत. पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता या आधी देखील वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीमुळे या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.


भाजपमध्ये अस्वस्था आहे - एकनाथ खडसे


या संदर्भात मीडियाशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, पंकजा यांचे विधान दुःखद आणि वेदनादायी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी पक्षासाठी आयुष्य दिले आहे. पंकजा मुंडे अस्वस्थ म्हणजे भाजपमध्ये अस्वस्था आहे. ज्यांनी भाजप पक्ष वर्षांनुवर्ष वाढवला, बहुजनांपर्यंत पोहोचवला आहे. आता जुन्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये छळ होत आहे, असा आरोप खडसे यांनी यावेळी केला.