जळगाव: मेगाभरतीमुळे भाजपमधील अनेक निष्ठावंतांवर अन्याय झाला. निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसला. त्यामुळेच भाजपचे सरकार गेले, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. ते रविवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी यांनी चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे समर्थन केले. खडसे यांनी म्हटले की, मेगाभरतीवर भाजपमधून सर्वप्रथम टीका करणारा मीच होतो. ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात प्रवेश कसा द्यायचा, हा सवाल मी त्यावेळी उपस्थित केल्याचे खडसे यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मेगा'भरती ही भाजपची चूक - चंद्रकांत पाटील


या मेगाभरतीमुळे पक्षातील अनेकांची तिकीटे कापली गेली. निष्ठावंतांवर अन्याय झाला. मात्र, राज्य नेतृत्वाने पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यांना आपण सहजपणे २२० जागा जिंकू, असे वाटत होते. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांना निवडप्रक्रियेवेळी डावलण्यात आले. निवडणुकीत याचा फटका भाजपला बसला.  ज्यांना भाजपने तिकिटे वाटली त्यांना जनतेने साफ नाकारले, असे खडसे यांनी म्हटले. तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच आता खरं बोलण्याची हिंमत दाखविल्याने मी त्यांचे अभिनदंन करतो, असेही त्यांनी सांगितले.


लग्नाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात, तुमची 'दिशा' चुकली


दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मेगाभरतीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून रविवारी यू टर्न घेतला. माध्यमांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. जे-जे आमच्या पक्षात आले त्यांचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे आमच्या पक्षाला मोठा फायदा झाल्याची सारवासारव पाटील यांनी केली होती.