Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता पुढच्या काही महिन्यातच राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं राजकीय घडामोडींना वेग आलाय.  महायुतीसुद्धा त्याच निवडणुकांसाठी अॅक्शन मोडवर आली आहे. विशेषत: भाजप खूपच सक्रिय झाली आहे. भाजपने विधानसभेसाठी खसा रणनिती आखली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीत भाजपला दुहेरी आकडाही गाठता आली नाही... याच निराशाजनक कामगिरीनंतर भाजप आता अॅक्शन मोडवर आलीय.. महाराष्ट्र भाजपकडून पराभवांच्या कारणांचा आढावा घेण्यात आला.. भाजप कोअर कमिटीची बैठक राज्याचे नवे प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.. यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.. 


आता एकला चलो रे ची भूमिका विधानसभेसाठी नको. स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये समन्वय राखा. महायुतीतल्या घटक पक्षांना एकत्र घेऊन आगामी निवडणुकीला सामारे जा असे आदेश भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत प्रभारींनी दिले आहेत. 
लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर समन्वय दिसून आला नव्हता.. तेव्हा आता लोकसभा निवडणुकीतल्या चुका टाळण्याकडे भाजपने लक्ष केंद्रीय केलंय.. टीम इंडियासारखेच एकत्र खेळून विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा बोलून दाखवलाय..


लोकसभा निवडणुकीत भाजपने 28 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त 9 खासदार निवडून आले. याचाच धडा भाजपने घेतलाय. त्यामुळे महायुती आता एकत्रितपणे विधानसभेला सामोरं जाणार आहे.
भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता


भाजप नेते आमदार प्रसाद लाड हे आगामी विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. त्यांनी सायन कोळीवाडा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलीय. पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढणार, असं लाड यांनी म्हटलंय. सध्या सायनमध्ये भाजपचेच आमदार आहेत...त्यामुळे सायनमधून लाड यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं भाजपमध्ये वाद होण्याची शक्यताय...