BJP Mission 125 for Maharashtra Vidhan Sabha: लोकसभा निवडणुकीतला राज्यातला निकाल भाजपसाठी धोक्याचा इशारा ठरलाय. त्यामुळेच आता विधानसभेआधी भाजपनं विशेष रणनिती आखलीय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या नेतृत्त्वात मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठकही पार पडली. 


अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप नेते 150 जागा लढवण्यावर ठाम आहेत. जाहीर वाद टाळावेत. महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ देऊ नका अशा सूचना भाजप नेत्यांना करण्यात आल्या आहेत. विधानसभेसाठीच्या जागांवरील सर्व्हेवर चर्चा करण्यात आली. जिंकणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी द्या अशी मागणी करण्यात आली. 


काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीपासून दूर असलेला संघही विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालेला आहे. भाजपच्या आगामी मिशन 125साठी भाजपचे मोठे नेते मिशन 125 च्या कामाला लागले आहेत,अशी सूत्रांची माहिती आहे.. 


विधानसभेसाठी भाजपचं मिशन'125'?


50 जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. उर्वरित 75 जागांसाठी विशेष प्रयत्न करणार. 75 जागांची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवणार. 'एक नेता, एक जिल्हा' धोरणाअंतर्गत प्रत्येक नेत्याला एका जिल्ह्याची जबाबदारी देणार आणि त्यानुसार निवडणूक रणनीती ठरणार.  ग्राउंड झिरोवर काम करत रिझल्ट मिळवणार. भाजप पदाधिकारी आणि नेत्यांनी  अमित शाहांच्या बैठकीत विधानसभेला भाजपनं 160 जागा लढल्या पाहिजेत अशी मागणी केलीय.. 288 जागांपैकी भाजपनं 160 जागा लढवल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाश शिंदेच्या शिवसेनेला प्रत्येकी 64 जागांवर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे. 


मोठी बातमी... अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?


विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली असली तरीही त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत.  दुसरीकडे अजित पवारांना महायुतीत घेतल्यांमुळे भाजपचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज आहेत. अशा परिस्थितीत भाजपसमोर  सव्वाशे पार पूर्ण करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.