मुंबई : वेगळा विदर्भ करण्यासाठी गरज पडली तर राजीनामा देणार असल्याची घोषणा भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. तर, गले की हड्डी बनलेली शिवसेना दूर झाली असल्यामुळे आता भाजपने वेगळा विदर्भ करावा, अशी मागणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली. शिवसेनेने वेगळ्या विदर्भासाठी वारंवार विरोध केला. भाजप मधूनही सकारात्मक भूमिका दिसली नसल्याचे वक्तव्य करून देशमुख यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.


‘लहान राज्य भाजपचं धोरण’


आमदार आशिष देशमुख म्हणाले की, ‘शिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा वेगळ्या विदर्भासाठी विरोध होता. त्यामुळे गळ्यातील हाड निघाले आहे. आता मराठीचे तीन राज्य निर्माण होण्यासाठी शिवसेनेने पुढे यावे. यातून राज्य निर्मिताचा प्रश्न केंद्रात सुटू शकतो. केंद्र सरकारच निर्णय घेतं. लहान राज्य हे भाजप पक्षाचे धोरण आहे. मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र दिले होते. त्यांनी अद्याप उत्तर दिले नाही. राज्यातील ज्येष्ठ नेत्यांकडून ठराव येऊ द्यावे, असे केंद्रातील नेत्यांचे म्हणणे आहे.


विदर्भातून बाहेर राज्यात स्थलांतर 


वित्तमंत्री विदर्भाचे आहेत. तरीही सिचंनासाठी तरतूद झाली नाही. विदर्भातील शेतक-यांना ७-८ तास वीज दिली नाही. याउलट तेलंगाना सरकार २४ तास शेतक-यांना वीज देत आहे. विदर्भातून बाहेर राज्यात स्थलांतर सुरू आहे. तरूणांच्या हाताला काम नाही. येणा-या कालावधीत युवकांच्या आत्महत्या सुरू होतील. 


सरकार बदलले तरी परिस्थीती जैसे थी...


विदर्भात शेतकरी आत्महत्या सत्र सुरू आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी अंमलात आणल्या नाही. ५० टक्के नका समाविष्ट करून हमीभाव ठरवावा ही महत्त्वाची शिफारस सरकारने मान्य केली नाही. ७ वेळा विदर्भ राज्य वेगळे व्हावे यासाठी अशासकीय ठराव विधिमंडळात आणला. भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. साडेतीन वर्ष प्रयत्न करूनही शेतकरी आत्महत्या कमी झाल्या नाहीत. सरकार बदलले तरी जमीनीवर बदल दिसत नाही.