भाजप आमदराचा पोलिसांना धमकावणारा व्हिडिओ व्हायरल
काय म्हणतात, भाजप आमदार?
औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापुरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात ते पोलीस स्टेशन मध्ये बसले असल्याचा दिसत आहे. पोलिसांसोबत त्यांचा वाद सुरू आहे असा तो व्हीडिओ आहे. त्यात पोलीस उपनिरीक्षक आणि त्यांच्यात चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे.
काही अवैध धंदे करणाऱ्या गाड्या पोलिसानी पकडल्या म्हणून त्या या पुढे पकडू नका असे पोलिसांना बंब सांगायला गेल्याची चर्चा आहे तर अवैध धंदे वाढले पोलिसांची हाफ्तेखोरी वाढली म्हणून पोलिसांना जाब विचारायला गेलो. पोलिसांच्या या वर्तणूकीची तक्रार करणार असल्याचं बंब यांचं म्हणणं आहे.. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हीडिओ सुद्धा एडिट करून दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.