नवी दिल्ली : भाजपचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबाबत वेगळीच माहिती समोर आलीय. प्रवासादरम्यान जातीचा दाखला हरवल्याची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जात वैधता पडताळणी समितीने दाखला अवैध असल्याचा निर्णय देण्याआधीच पोलिसात तक्रार झाल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. 9 तारखेला प्रवासादरम्यान दाखला हरवला आहे. 


असा अर्ज 14 तारखेला पोलिसात खासदारांच्या नावाने करण्यात आलाय. विशेष म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी या जात प्रमाणपत्र बाबत अंतिम सुनावणी पार पडली त्यावेळी दाखला उच्च न्यायालयात असल्याची माहिती खासदारांच्या वकिलांनी दिली होती



उमेदवारी अर्ज भरताना दिलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय जात पडताळणी समितीने घेतला आहे. त्यांचा जातीचा दाखल बनावट असल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे. 


जात पडताळणी समितीने गेल्या आठवड्यात याबाबत सुनावणी पूर्ण केली होती. जयसिध्देश्वर स्वामी यांनी दिलेले पुरावे योग्य नसल्याने समितीने जात प्रमाणपत्र रद्द केले.लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. जयसिद्धेश्वर स्वामी यांनी सोलापुरातून लोकसभेची निवडणूक लढताना वंचित विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव केला होता. 


मात्र, या निवडणुकीसाठी जयसिद्धेश्वर स्वामींना सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे आणि विनायक कंडकुरे यांनी तक्रार दाखल केली होती. हिंदू लिंगायत जात असताना बेडा जंगम जातीचा दाखला दिल्याचा आरोप त्यांनी यामध्ये केला होता. चौकशीअंती या तक्रारीत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी धोक्यात आली आहे. दरम्यान, याविरोधात जयसिद्धेश्वर स्वामी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे समजते.