प्रथमेश तावडे, झी मीडिया, भाईंदर : विकास आराखड्यात (Development plan) त्रुटी असल्याने आज भाजपाने मीरा भाईंदर (Mira Bhaynder) पालिके विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta)  यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनाला हजारोंच्या संख्यने कार्यकर्ते उपस्थित होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहराचा प्रस्तावित नवीन विकास आराखडा (Development plan) लोकाभिमुख नसून त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.त्यामुळे पुढच्या 20 वर्षात  मीरा भाईंदर  शहरात होणारे आयटी  पार्क, री डेव्हलपमेंट प्लॅन्स व शहराच्या विकासाला खिळ बसणार आहे. याच शिवाय प्रस्तावित विकास आराखड्यात असलेले रेल्वे परिसरात रेल्वे प्रवाशांसाठी रिक्षा स्टॅन्ड, बस टर्मिनल, आपत्कालीन व्यवस्था, उद्याने, मैदाने, वैद्यकीय सुविधा यांवर पारिणाम होणार असल्याने त्याला जोरदार विरोध करत भाजपाने पालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढला होता.


भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौकापासून ते पालिका मुख्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता. ज्यात हजारोच्या संख्येने जमलेल्या आंदोलनकर्त्यांनी विकास आराखड्याला विरोध दर्शवत निदर्शने केली. या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी  पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकल्यानंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन हा विकास आराखडा रद्द करण्याबाबत मागणी केली.


मीरा भाईंदर पालिकेचा (Mira Bhaynder) हा विकास आराखडा पुढचे 20 वर्ष मीरा भाईंदर करांचे भविष्य ठरविणारा आहे. त्यामुळे  हा वादग्रस्त विकास आराखडा रद्द करण्यासाठी आमचा संघर्ष शेवटपर्यंत सुरु राहणार असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांनी व्यक्त केला आहे.