सातारा : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे त्यांच्या हटके स्टाईलासाठी ओळखले जातात. उदयनराजे कधी 'पुष्पा' सिनेमातील (Pushpa The Rise) डॉयलॉग बोलतात तर कधी बाईक रायडिंग करतात. उदयनराजेंचं बाईकप्रेम हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. असाच त्यांचा हटके अंदाज पुन्हा एकदा सातरकरांना आणि राज्यातील जनतेला अनुभवयाला मिळाला आहे. उदयनराजेंनी 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या सेटवर थेट बाईकवरुन एन्ट्री घेतली. (bjp rajyasabha mp udayanraje bhosale grand entry on bullet in chala hawa yeu dya comedy show set)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


उदयनराजेंचा उद्या (24 फेब्रुवारी) वाढदिवस (Udayanraje Bhosale Birthday)  आहे उद्यनराजेंच्या वाढदिवसानिमित्त शहरात गेल्या 4 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. याचाच एक भाग म्हणून झी मराठी या वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले यांची पुष्पा या चित्रपटातील गाण्यावर बाईक वरून अनोखी इंट्री पहायला मिळाली.


क्रेनच्या सहाय्याने 50 फुटांवरून उदयनराजे बसलेली बाईक आणण्यात आली. यावेळी 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाचे दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ निलेश साबळे यांनी उदयनराजेंना 'पुष्पा' सिनेमातील  डायलॉग सादर करण्याची विनंती केली. उदयनराजेंनी ही विनंतीही मान्य केली. उदयनराजेंनी 'पुष्पा झुकेगा नहीं साला' असा डायलॉग सादर करून सर्व चाहत्यांना दाद दिली. उदयनराजेंच्या या ग्रँड एन्ट्रीचा आणि डायलॉगचा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.