Chandrashekhar Bawankule reply to Ajit Pawar: हिवाळी अधिवेशनाच्या मुहूर्तावर (Maharashtra Assembly Winter Session 2022) राज्यातील राजकारण आणखी तापल्याचं पहायला मिळतंय. गुवाहाटीला चला तुम्ही, सुरतेला चला.. खोक्यांनी लुटा, कधी खोऱ्याने लुटा..., अशा घोषणा देत विरोधकांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावू धरली. त्याचवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अजित पवारांनी बावनकुळेंनी अधिवेशनात हल्ला परतवून लावला. त्यावर आता बावनकुळे यांनी अजितदादांचा सूर आवळण्याचा प्रयत्न केला आहे. (Chandrashekhar Bawankule reply to Ajit Pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे ठेवलं. ते जयंत पाटील (Jayant Patil) यांना द्यायला हवं होतं. येत्या 2024 निवडणुकीत (Assembly Elections 2024) अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजितदादांना चिमटे काढले होते. त्यानंतर अजित पवारांनी विधानसभेत जोरदार टोलेबाजी केली.


बारामतीत (Baramati) येऊन घड्याळ बंद होणार, पवारांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी भाषा भाजपचे नेत्यांकडून केली जात आहे. मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, असं म्हणत अजित पवारांनी बावनकुळेंवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आता बावनकुळे यांनी देखील अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय.


आणखी वाचा - Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने होते जेलमध्ये; जाणून घ्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम


दरम्यान, आपला करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत अजित पवारांमध्ये नाही, असं म्हटलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule reply to Ajit Pawar) यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलंय. उलट 2024 मध्ये बारामतीची जनताच अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम करेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.