Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने होते जेलमध्ये; जाणून घ्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम

Anil Deshmukh Case : अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका झाली. या बातमीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेमक्या या प्रकरणाची सुरूवात कशी झाली? कोण-कोणत्या घडामोडी घडल्या? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली महत्वाच्या मुद्यातून जाणून घेऊयात. 

Updated: Dec 28, 2022, 06:11 PM IST
Anil Deshmukh : अनिल देशमुख 14 महिने होते जेलमध्ये; जाणून घ्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम title=

Anil Deshmukh Case : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज तुरूंगातून सुटका होणार आहे. देशमुख यांच्यावर 100 कोटी वसूलीचा (100 crore extortion case) आरोप होता. उच्च न्यायालयाने सीबीआयची मागणी फेटाळून लावत 13 महिने 27 दिवस तुरूंगात असलेले अनिल देशमुख यांच्या जामिनावर सुटकेचा मार्ग मोकळा केला होता.त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज सुटका होणार आहे. या बातमीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली आहे. दरम्यान नेमक्या या प्रकरणाची सुरूवात कशी झाली? कोण-कोणत्या घडामोडी घडल्या? अनिल देशमुख यांच्यावर काय आरोप झाले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे खाली महत्वाच्या मुद्यातून जाणून घेऊयात. 

वाचा संपूर्ण घटनाक्रम

1) 8 मार्च 2021 – हे प्रकरण महाराष्ट्र पोलिसांकडून राष्ट्रीय तपास संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आले.
2) 13 मार्च 2021 – तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेला (Sachin Waze) अटक करण्यात आली.
3) 17 मार्च 2021 – विद्यमान पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambeer singh) यांची होमगार्ड आणि नागरी संरक्षण कमांडर जनरल म्हणून बदली करण्यात आली.
4) 18 मार्च 2021 – माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी अँटिलिया प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी केलेल्या गंभीर त्रुटींबद्दल एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत दिली.
5) 20 मार्च 2021– परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.
6) 21 मार्च 2021 – परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली आणि अनिल देशमुख यांनी केलेल्या गैरकारभाराची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) चौकशीची मागणी केली.
7) 21 मार्च 2021 – डॉ. जयश्री पाटील, अधिवक्ता यांनी श्री देशमुख यांच्या विरोधात श्री सिंह यांनी लिहिलेल्या पत्रावर एफआयआर नोंदवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
8) 23 मार्च 2021 – तक्रारीवर कोणतीही कारवाई न केल्यावर, डॉ. पाटील यांनी सीबीआय/अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली.
9) 5 एप्रिल 2021 – उच्च न्यायालयाने सीबीआयला अनिल देशमुख  (Anil Deshmukh) यांच्याविरुद्ध प्राथमिक चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
10) 14 एप्रिल 2021 - परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवरुन  सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जबाब नोंदवला.

11) 24 एप्रिल 2021- लाचखोरी, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपाखाली सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. त्याच्या निवासस्थानाचीही झडती घेतली.
12) 11 मे 2021- बेकायदेशीरपणे पैसे मिळवल्याच्या आरोपाखाली ईडीने देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.
13) 19 मे 2021 – सचिन वाझे यांचे विधान नोंदवले गेले की त्यांना अनिल देशमुख यांनी बार आणि रेस्टॉरंटमधून दरमहा 3 लाख रुपये गोळा करण्याचे निर्देश दिले होते.
14) 25 मे 2021 – ED ने अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्या नागपूर, अहमदाबाद आणि मुंबईतील सहा निवासी आणि कंपनीच्या जागेवर झडती घेतली.
15) 16 जून 2021 – ED ने नवी दिल्लीत देशमुख कुटुंबियांंच्या कंपन्यांचा शोध घेतला.
16) 25 जून 2021 – ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पहिले समन्स जारी केले.
17) 26 जून 2021 – अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव आणि खाजगी सहाय्यक यांना त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर अटक करण्यात आली.
18) 28 जून 2021- ईडीने अनिल देशमुख यांना दुसरे समन्स जारी केले.
19) 2 जुलै 2021 – ईडीने अनिल देशमुख यांना तिसरे समन्स जारी केले.
20) 30 जुलै 2021 – ईडीने अनिल देशमुख यांना चौथे समन्स जारी केले. 

21) 16 ऑगस्ट 2021 – ईडीने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना पाचवे समन्स जारी केले. त्याच दिवशी त्याांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन समन्स रद्द करण्याची मागणी केली जी नाकारण्यात आली होती.
22) 29 ऑक्टोबर 2021 – त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार दिला.  
23) 1 नोव्हेंबर 2021 – अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाले आणि त्यांची 12 तास चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली.
24) 2 नोव्हेंबर 2021 – मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत विशेष न्यायालयाने श्री. देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले.
25) 6 एप्रिल 2022 - याच प्रकरणात अनिल देशमुख यांना CBI ने अटक केली
26) 4 ऑक्टोबर 2022 - ईडी केसमध्ये अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
27) 2 डिसेंबर 2022 - CBI केसमध्ये अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

दरम्यान लवकरच अनिल देशमुख जेलबाहेर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी वरळीतल्या घराबाहेर पोस्टर्स लागले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या सुटकेवर आनंद व्यक्त होत आहे.