भाजप कार्यकर्ता चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल
आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदूरसनीमध्ये भाजप कार्यकर्ता जयसिंग चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यवतमाळ : आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत शेंदूरसनीमध्ये भाजप कार्यकर्ता जयसिंग चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शाळकरी मुलीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जयसिंग चव्हाण हा भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या नावाने गावात दहशत पसरवतो, शिवाय शाळकरी मुलींना धमकावून शारिरीक संबंधांची मागणी करतो, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केलाय.
मुलींची रस्त्यात छेडही तो काढतो असाही आरोप त्याच्यावर करण्यात आलाय. आर्णी पोलिसांत यासंदर्भात तक्रार करण्यात आलीय. आमदार तोडसाम आधीच कथित ऑडिओ क्लिपमुळे वादात असताना त्यांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी समोर येतेय.