Nashik Fire : जिंदाल कंपनीत स्फोटानंतर मोठी आग, 100 पेक्षा जास्त लोक अडकल्याची माहिती
Jindal company Blast and fire : नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनीत मोठा ब्लास्ट झाला. यानंतर मोठी आग लागली असून आगीचे लोट आकाशात पसरलेत.
Jindal company Blast and fire : नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनीत मोठा ब्लास्ट झाला. यानंतरम मोठी आग लागली असून आगीचे लोट आकाशात पसरले होते. यावरुन आगीची तीव्रता लक्षात येत आहे. नाशिक मुंबई महामार्गावर गोंदे गावाजवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये स्फोट झाला आहे. या कंपनीतील बॉयलर फुटल्याची चर्चा असून स्फोट इतका मोठा होता की परिसरात मोठा आवाज आला. कंपनीतील स्फोटाचा आवाजआजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये ऐकायला मिळाला. या स्फोटाचा धक्का अनेक लोकांना बसला. कंपनीत 100 पेक्षा जास्त कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही कंपनी बंदिस्त परिसरामध्ये असल्यामुळे अजून पूर्णपणे माहिती समोर आलेली नाही. पोलीस घटनास्थळी आले असून नेमकं काय घडले याचा तपास केला जात आहे.
कंपनीत अनेक कामगार अडल्याची भीती
जिंदाल समूहाच्या पोलिफिल्मची निर्मिती करणाऱ्या या कंपनीत आधी स्फोट झाला आणि या स्फोटमुळे आग लागली. आगीमध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काही कर्मचारी हे आत अडकल्याचंही सांगण्यात येत आहे. पोलिसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे हे रवाना झाले आहेत.
दरम्यान, आग इतकी मोठी होती की धुराचे मोठ मोठे लोट आकाशात दिसत होते. कंपनीच्या संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसून येत होते. घटनास्थळावर बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, स्फोटामुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. कंपनीत लागलेली भीषण असून कंपनीतीलच काम करणारे काही कामगार होरपळून जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. तसेच या आगीचे कारण समजू शकलेले नाही. बॉयरलचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही वेळ कंपनीत आग लागल्यानंतर छोटे छोटे स्फोट होत होत होते.
संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य