कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : एकमेकांना आधारासाठी त्या अंध जोडीने लग्नगाठ बांधली... दोघांनी एकमेकांच्या साहाय्याने संसारही सुरु केला... पण, सुखाने चाललेल्या त्यांच्या संसाराला नजर लागली आणि आज हे कुटुंब जगण्यासाठी धडपड करतंय... रूपाली आणि कांतीलाल यांचं वर्षभरापूर्वी लग्न झालं... दोघेही नेत्रहिन... एकमेकांना आधार म्हणून त्यांनी लग्न केलं... मात्र, काही महिन्यांपूर्वी घरात कुकरची वाफ अंगावर आल्याने रूपाली भाजल्या. तेव्हापासून त्या अंथरूणाला खिळून आहेत... चिक्कीचा व्यवसाय करणाऱ्या कांतीलाल यांना रूपाली यांच्यापाशी थांबावं लागतं. त्यामुळे घरभाडं, लाईटबील थकलं आहे. दोघांवरही उपासमारीची वेळ आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढं कमी म्हणून की काय एका सामाजिक संस्थेनेही मदतीच्या नावाखाली त्यांना फसवलं... १० हजार रूपये आणि किराणा माल देणार असल्याचं जाहीर करून संस्थेनं सोशल मीडियावर आपल्या कामाचा गवगवा केवला. मात्र, मदत या दाम्पत्यापर्यंत आलीच नाही.


जगण्याचा संघर्ष सुरू असतानाच ही फसवणूक झाल्यामुळे पावरा पती पत्नी खचून गेलेत. त्यांना आधार देण्याची गरज आहे...