कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : ....तो पुणे विद्यापीठात सेंटर फॉर डीसऍबलिटीज विभागात कोओर्डीनेटर..! डोळ्यान अंध...! ती एम कॉम शिक्षित..एका खाजगी कंपनी मध्ये कामाला...! डोळ्याने अंध..! दोघांची भेट झाली,  त्यानंतर प्रेम आणि आता काही दिवसात लग्न...! खरं तर ही एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही कथा..तुम्हाला ती खोटी ही वाटेल. परंतू पिंपरी चिंचवड च्या एका जोडप्याच्या आयुष्यात हे घडतं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनंजय भोळे पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर डीसऍबलिटीज विभागात कोओर्डीनेटर म्हणून काम करतात.  सध्या एकसेसीबीलिटी या विषयात पी एच डी करत आहेत. केंद्र सरकारचा राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. डोळ्याने अंध असताना ही ते अनेकांसाठी प्रेरणा देणारे आयुष्य ते जगत आहेत.  त्यांच्या आयुष्यात जोडीदार म्हणून येणाऱ्या आहेत तेजस्विनी भालेकर. त्यांचे एम कॉम पर्यंत शिक्षण झालं आहे.


एका खाजगी कंपनीत त्या नोकरीला आहेत. दुर्दैवाने त्या ही अंध आहेत. दृष्टीहीन असले तरी या दोघांची एक 'डोळस' प्रेम कहाणी आहे. धनंजय भोळे आणि तेजस्विनी यांची भेट काही वर्षांपूर्वी झाली. हळू हळू बोलणे सुरू झाले.  दोघांना ही एकमेकांचा स्वभाव आवडू लागला. सहा महिन्या पूर्वी पर्यंत त्यांना ते लग्न करतील असं वाटत नव्हते.



परंतु धनंजय यांनी तेजस्विनीला मागणी घातली. स्वभाव आवडत असला तरी भविष्य अवघड आहे याची जाणीव तेजस्विनीला होती. दोघांनी एकत्र राहायचे ठरवले तर काय अडचणी अडचणी येतील याचा विचार ती करत होती. अडचणी आहेत याची जाणीव ही तीला झाली. परंतू एकमेकांवर असलेला विश्वास, प्रेम याच्या जोरावर अखेर दोघांनी निर्णय घेतला लग्नाचा. तंत्रज्ञानाचा आधार घेत आणि प्रेमाच्या जीवावर आयुष्य आनंदाने जगू असं ते सांगतात.


दोन्ही कुटुंबातील वडीलधाऱ्यानी ही त्यांचा निर्णय मान्य केला. तरीही त्यांना आव्हानांची कल्पना आहे. त्यांच्या भविष्याचा विचार करून ते भावनिक ही होत आहेत. परंतू जोपर्यंत आम्ही आहोत तो पर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असं दोन्ही कुटुंबीय सांगतात..आता लवकरच तेजस्विनी आणि धनंजय लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. त्यासाठी प्री वेडिंग फोटोशूट, साखरपुडा, हळदी आणि लग्न असे सर्व विधी ते हौसेने करणार आहेत. दिसत नसले तरी लग्नाची सगळी  हौस मौज करणार असल्याचे धनंजय तेजस्वीनी सांगतायेत.


खरे तर आज काल छोट्या मोठ्या कारणावरून पतीपत्नींमध्ये वाद होतात ते पराकोटीला जातात. तिथे धनंजय आणि तेजस्विनी केवळ आणि केवळ प्रेमाच्या जीवावर ते लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यांनी केलेली  भविष्याची त्यांची आखणी पाहुन ही एक डोळस प्रेम कथा आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.  त्यांच्या या भावी आयुष्याला खूप खूप शुभेच्छा.