Mumbai News : काही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणरायाचं जोरदार आगमन होणार आहे. सार्वजनिक गणपती मंडळांनीही मोठी तयारी केली आहे. मुंबई महापालिकेने सर्व गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. (BMC Guidline 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही पण मंंडळाच्या मंडपांची उंची ही 30 फूट असायला हवी. त्यामुळे यंदा 30 फूटापेक्षा उंच मंडप उभारून चालणार नाही. मंडप बांधलेल्या ठिकाणी रस्त्याच्या परिसरामध्ये तुम्ही खड्डा केलेल्या मंडळांना 2000 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.


मंडळाचा मंडप हा 25 फूटांपेक्षा जास्त उंच असेल तर मंडप बांधणीचा अहवाल हा मुंबई महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यासोबतच प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मनपाची लोकांच्या उपयोगी पडणारी भित्तीपत्रकं मंडळांना लावावी लागणार आहेत. 


गणेशोत्सवादरम्यान साथीचे रोग पसरणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. आवाजाची मर्यादा ही पाळावी लागणार असून तुम्ही ती ओलांडली तर कारवाई होऊ शकते. मंडपाच्या अंतर्गत भागात कोणतेही स्टॉल तुम्हाला लावता येणार नाहीत. ज्या ठिकाणी मंडप उभारणार आहात त्या ठिकाणी वाहनांना आणि पादचाऱ्यांसाठी जागा सोडावी लागणार आहे.