BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. पालिकेच्या सायन रुग्णालया अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती निघाली आहे. येथे नोकरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार २४ हजार २०० ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. याअंतर्गत बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ, पोषण वैधकीय अधिकारी, संशोधक अधिकारी, माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यव्यस्थापक, आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक, समुपदेशक पदांच्या प्रत्येकी एक जागा भरल्या जाणार आहेत. 


बालरोग व एच आय व्ही विशेषतज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींकडे एम. डी (बालरोगतज्ज्ज्ञ ) डी. एन.बी (बालरोगतज्ज्ज्ञ ) पदवी, बालरोग व एचआयव्ही मेडिसिन विशेषतज्ञमध्ये २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 


पोषण वैधकीय अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमडी, डीएनबीची पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ६० हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 
 
संशोधक अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमएससी आणि एचआयव्ही संशोधन क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ४४ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.


माहिती व तंत्रज्ञान सुविधा व्यवस्थापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे बीसीए/बीएससीआयटी/डिप्लोमा आयटी आणि टेलिमेडिसिन विभागाचा २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ४२ हजार ५०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.


 



 
आहारतज्ज्ञ तथा समुपदेशक  पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पी.जी डिप्लोमा न्यूट्रिशियन आणि डायटेटिक्स असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.


समुपदेशक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सोशल वर्क किंवा मानसशास्त्र विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा २४ हजार २०० रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. 
 
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज आवक जावक विभाग, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, बृहन्मुंबई, मुंबई या पत्त्यावर पाठवायचे आहे.   २२ जून ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज त्याआधी पोहोचतील अशा बेताने पाठवायचे आहेत.