Mumbai Girl Hostel Murder: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेट येथील मुलींच्या वसतिगृहात तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमध्ये या तरुणीचा मृतदेह अवस्थेत आढळला आहे.अतिप्रसंग करून या तरुणीची हत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मरीन ड्राईव्ह याचा तपास करत आहेत. 


सरकारी वसतिगृहाततील खळबळजनक प्रकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चर्चगे येथील सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे. हे सरकारी वसतिगृह असल्याचे समजते.  
मंगळवारी रात्री हॉस्टेलच्या चौथ्या मजल्यावर विवस्त्र अवस्थेत तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृत तरुणीचे वय 18 वर्षे असल्याचे समजते. तरूणीवर अतिप्रसंग करून गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. यानंतरच मृत्यूमागचे कारण समोर येईल.  


हॉस्टेलच्या सुरक्षा रक्षकाने केली आत्महत्या


हे हत्या प्रकरण उघडकीस येण्याआधीच हॉस्टेलचा सुरक्षारक्षक गायब झाला होता. पोलिसांनी  त्याचा शोध घेतला. मात्र, या सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिस अधिक तपास करत आहेत. ही तरुणी कोण आहे?  याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 


प्रेम संबंधाला विरोध केला म्हणून लेकीने बापाचाच काटा काढला


प्रेम संबंधाला विरोध केला म्हणून लेकीने बापाचाच काटा काढला. पुण्याच्या वडगावशेरीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 30 मे ला जॉन्सन लोबोची हत्या त्याच्या पोटच्या लेकीनेच केली. त्यासाठी आईचीही मदत घेतली. तर 1 जूनला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली. गुन्हा उघड होऊ नये म्हणून मृताच्या पत्नीने पतीच्या मोबाईलवरुन मेसेजही पाठवला. मात्र, सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला.