COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीड : घराच्या अंगणात पेटत असलेल्या कचऱ्यातील बॉडी स्प्रेचा स्फोट झाल्याने चार जणं भाजून जखमी झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. बीड शहरातील शाहूनगर भागात राहणाऱ्या सांगळे कुटूंबानं अंगणात पडलेला केरकचरा पेटवून दिला. त्यावेळी अंगणात विमल सांगळे काम करत होत्या आणि त्यांची मूल खेळत होती. अचानक या कचऱ्यातून मोठा स्फोट झाला. त्यात विमल सांगळेंसह तीन मुलं भाजली.


या स्फोटाचा आवाज ऐकून आसपासचे लोकं पळत आले तेव्हा अंगणात केवळ धुरच दिसत होता. जखमींना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कचऱ्यामध्ये शेजारच्या व्यक्तीने टाकलेले बॉडी स्प्रे,रूम फ्रेशनर होते. त्याचाच स्फोट झाला असावा अशी शक्यता सांगळे कुटुंबाने व्यक्त केली आहे.