Bogus Degree Certificate : राज्यात पुन्हा एकदा बोगस डिग्रीचे मोठे रॅकेट समोर आले आहे.  अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांनी बनावट पदव्या विकणा-या टोळीचा पर्दाफाश केलाय. पोलिसांनी या टोळीतील एकाला अटक केली असून त्याच्याकडून जवळपास 200 बोगस पदव्या जप्त करण्यात आल्या आहे. ही टोळी अवघ्या 50 ते 60 हजारांमध्ये BHMS, MBA, पॅरामेडिकल, दहावी, बारावीचं प्रमाणपत्र द्यायची. या टोळीचे धागेदोरे दिल्लीपर्यंत असल्याचं समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसच 10 वी, 12 वीच्या बोगस मार्क्सशीट्सची विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती.  त्याआधारे पोलिसांनी आरोपी अशोक सोनावणेला अटक केली आहे. 
नगर शहरातील बालिकाश्रम रोडवर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या विविध विद्यापीठांच्या बनावट पदव्या तसेच 10 वी, 12 वी चे बनावट गुणपत्रके, प्रमाणपत्रे तयार करून त्याची 50 ते 60 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या रॅकेटचा तोफखाना पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. हे रॅकेट चालविणारा एक जण पकडण्यात आला असून त्याच्याकडून 10 वी, 12 वी चे बनावट गुणपत्रके, काही बनावट पदव्या जप्त करण्यात आल्या आहेत. या रॅकेटचे धागेदोरे थेट दिल्लीपर्यंत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या प्रकरणात बालिकाश्रम रोडवरील रुद्र एज्युकेशन सोसायटीचे पॅरामेडीकल कॉलेज चालविणारा अशोक सोनवणे याला पोलिसांनी अटक केली आहे. 


दिल्ली येथील सचिन आणि चेतन शर्मा हे सोनवणे याला बोगस डिग्री बनवून देत असल्याचे पोलिस तपासात पुढे आले. हे दोघेही त्याच्या परिचयाचे आहेत.  असून या तिघांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अशोक सोनवणे याने आजपर्यंत किती जणांना अशा बनावट पदव्या विकल्या आहेत. याचा शोध पोलिस घेत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट पदवीधर तसेच विविध पदव्या घेतलेले समोर येण्याची शक्यता आहे.


नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस डिग्री बनवून थेट इराकमध्ये अनेकांनी नोक-या लाटल्या


नागपूर विद्यापीठाच्या नावाने बोगस डिग्री बनवून थेट इराकमध्ये अनेकांनी नोक-या लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. अशा 27 जणांबद्दल इराक सरकारनं भारतातील इराकी दुतावासाशी संपर्क साधला. दुतावासानं नागपूर विद्यापीठाशी संपर्क साधला असता असे कोणतेही तरूण नागपूर विद्यापीठाच्या महाविद्यालयात शिकले नसल्याचं समोर आलंय. याचाच अर्थ नागपूर विद्यापीठाच्या नावाने 27 बोगस डिग्री बनवून या तरूणांनी इराकमध्ये नोकरी लाटलीय. यातील 24 तरूण फार्मसी विद्या शाखेतील आहेत तर 2 अभियांत्रिकी शाखेचे असून 1 बोगस डिग्री मायक्रोबायोलॉजी अभ्यासक्रमाची आहे. विशेष म्हणजे बोगस डिग्री तयार करताना विद्यापीठातील तत्कालीन सक्षम अधिका-यांच्या नावानं बोगस डिग्रीवर स्वाक्ष-याही करण्यात आल्या आहेत.