Pradeep Sharma: माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना लखन भैया चकमक प्रकरणात दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2006 साली घडलेल्या लखनभैया चकमक प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत मुंबई उच्च न्यायालयाने 12 जणांना शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने 13 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची शिक्षा कायम ठेवली आहे तर, सहा जणांची सुटका केली आहे. तर, न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना तीन आठवड्यात सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत. 


कोर्टाने निर्णय पालटला


लखन भैया चकमक प्रकरण मुंबईत तेव्हा फार चर्चेत राहिले होते. 2006 मध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. ही चमकच बनावट असल्याचे एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील 13 अधिकारी आणि पोलिस दोषी आढळले होते. त्यात प्रदीप शर्मांचे नावदेखील होते. 2008 मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र कनिष्ठ न्यायालयाने १२ अधिकाऱ्यांनी दोषी ठरवले होते व प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली होती.


प्रदीप शर्मा यांच्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय फेटाळून त्यांना दोषी ठरवले आहे. त्याचबरोबर 12 अधिकाऱ्यांच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं प्रदीप शर्मा यांना मोठा धक्का बसला होता. प्रदीप शर्मा १९८३ च्या बॅचचे अधिकारी होते. ते 2020मध्ये निवृत्त होणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. 2019मध्ये त्यांनी लोकसभा लढवली होती. मात्र त्यात त्यांना अपयश आले. 



प्रदीप शर्मा यांच्यासह दोषी ठरवण्यात आलेले अधिकारी


पोलीस अधिकारी


प्रदीप सूर्यवंशी (लखन भैयावर दोनदा गोळ्या झाडल्या)


असिस्टंट पोलिस इंस्पेक्टर
नितिन सरतापे
दिलीप पलांडे


पोलिस सब इंस्पेक्टर
गणेश हरपुडे
आनंद पटाडे


पोलिस कर्मचारी


रत्नाकर कांबळे 
तानाजी देसाई (यांनी एक गोळी झाडली)
प्रकाश कदम
पांडुरंग कोकम
संदीप सरदार
देवीदास सकपाल
विनायक शिंदे


कोर्टाने सहा जणांची निर्दोष मुक्तता केली


कोर्टाने सहा प्रायव्हेट व्यक्तींची निर्दोष सुटका केली आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे शैलेंद्र पांडे (अपहरणाचा आरोप), अखिल खान, मनोज राज, सुनील सोळंकी, मोहमद शेख, सुरेश शेट्टी