मुंबई : एका आईने आपल्या 23 वर्षीय मुलीची हत्या केली होती. त्या हत्येचं कारण होती की, तिची मुलगी प्रियकराबरोबर पळून जात होती. 40 वर्षीय आरोपी आईने मुलीच्या हत्येची कबुली न्यायालयात दिली. परंतु तरी ही मुंबई उच्च न्यायालयाने त्या आरोपी महिलेला जामीन मंजूर केला. हे कसं शक्य आहे? हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण त्याचं खरं कारण आहे की, त्या महिलेने आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याचा दावा केला होता, परंतु एका प्रत्यक्षदर्शीने कोर्टात साक्ष दिली की, ही हत्या त्या आईने केली नाही तर, याचा खरा आरोपी त्या मृतव्यक्तीच्या भाऊ आहे. यामध्ये आईने आपल्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मृताच्या भावाने रागाने त्याच्या बहिणीचा ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचे सत्य समोर आले आहे.


संपूर्ण प्रकरण काय आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी महिलेला जामीन देताना कोर्टाने म्हटले आहे की, प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार आरोपी भावाने बहिणीचा गळा आवळून हत्या केली. त्यावेळी ती महिला त्या मुलीच्या पायावर बसली होती. त्यामुळे घटनेची परिस्थिती लक्षात घेता आरोपी महिलेला अधिक कैदेत ठेवण्याची आवशकता नाही असे न्यायालसाने सांगितले.


आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरूद्ध 23 वर्षीय पीडिता एका मुलाच्या प्रेमात पडली. तिच्या प्रियकरासह पळून जात असताना कुटुंबीयांनी मुलीला पकडले आणि त्यानंतर तिच्या भावाने ओढणीने तिचा गळा आवळून हत्या केली. यानंतर मृत मुलीची आई पप्पू वाघेला यांनी मुंबईतील पायडोनी पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या मुलीच्या हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.


तपासणी दरम्यान उघड


जेव्हा चौकशी सुरू झाली तेव्हा आरोपी महिलेच्या जावयाने सांगितले की, सासूने त्या मुलीची हत्या केली नाही, ही हत्या त्याच्या मेव्हण्याने केली आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने मृत मुलीचा भाऊ आकाश वाघेला याला अटक केली.


प्रत्यक्षदर्शी जावयाने आपल्या जबाबात म्हटले आहे की, "मी जेव्हा 17 नोव्हेंबर 2019 रोजी घरी पोहोचलो तेव्हा दरवाजा बंद होता. मी जोरात धक्का देऊन तो उघडला, तेव्हा मेव्हणी जमिनीवर पडली होती आणि पप्पू वाघेला म्हणजेच त्याची सासू मेव्हणीच्या पायावर बसली होती. तर मेव्हणा आकाश मेव्हणीचा गळा दाबत होता. "


प्रत्यक्षदर्शी जावयाच्या या साक्षीचे मृत मुलीच्या दुसर्‍या भावाने समर्थन केले आहे. त्याने सांगितले की, खुनाच्या दिवशी आरोपी भाऊ रडत घराबाहेर आला आणि त्याने हे कबुल केले होते की, त्याने बहिणीची हत्या केली होती.


सत्य बाहेर आले


ही घटना प्रसंवधान नसल्याने आणि मुद्दाम ठरवून घडली नाही असा युक्तिवाद करून आरोपीचे वकील सय्यद अब्बास यांनी मृत मुलीच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु आईने मुलीची हत्या केली नव्हती असे प्रत्यक्षदर्शीने स्पष्ट साक्ष दिली. त्यामुळे मारेकरी हा त्याचा मेहुणे आहे. प्रत्यक्षदर्शीच्या उत्तरावर विश्वास ठेवून कोर्टाने आरोपी पप्पू वाघेला यांना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक बाँडचा जामीन मंजूर केला आहे.