Wedding VIDEO: एका लग्नाची अनोखी गोष्ट... लंडनचा मुलगा आणि संभाजीनगरची मुलगी, थाटामाटात लागला लग्नसोहळा
Sambhajinagar Wedding : संभाजीनगर (Sambhajinagar and London Wedding Video) मधल्या झालेल्या या लग्नाची मज्जाच काहीतरी खास आहे.
Sambhajinagar Wedding : आपल्या इथे लग्न म्हणजे एक मोठी पर्वणीचं असते. लग्न म्हटलं की, धम्माल, मज्जामस्ती आणि सगळं काही... त्यामुळे इन्टाग्रामवरही (Wedding Videos on Instagram) असे अनेक फोटोज आणि व्हिडीओज हे व्हायरल होत असतात. लग्नसभारंभं त्यासाठीच आपल्याकडे खूप लोकप्रिय आहेत. लग्नाला कोणत्याही वयाचे, स्थाना किंवा आताच्या जमान्यात धर्माचेही बंधन नसते. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडेच गंमत उडवून दिली आहे. तेव्हा जाणून घेऊया अशाच एका अनोख्या (Wedding News) लग्नाबद्दल... आम्ही पण तुम्हाला आज अशाच एका लग्नाची गोष्ट सांगणार आहोत. त्यातून नवरदेव हा परदेशी आहे आणि नवरी ही भारतीय आहे आणि त्यांच्या लग्नाचा बार हा थेट संभाजीनगरमध्ये उडवला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडेच या अनोख्या लग्नाची चर्चा आहे.
आपल्यालाही असंच वाटतं की आपलं लग्न हे सगळ्यांपेक्षा वेगळं असावं. त्याचबरोबर आपल्याही लग्नात अनेक पाहूणे यावेत आणि सगळ्यांनीच आपल्या लग्नात प्रचंड मज्जा करावी. लग्नाचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे नवरानवरी. त्यातून मोठं आकर्षण म्हणजे दुसरं काहीच नाहीच. परंतु संभाजीनगर (Sambhajinagar and London Wedding Video) मधल्या झालेल्या या लग्नाची मज्जाच काहीतरी खास आहे.
संभाजीनगरमध्ये एक आगाळावेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. यात नवरदेव होता लंडनचा आणि नवरी मुलगी होती आपल्या संभाजीनगरची. सांची आणि एडवर्ड असं या नववधू-वराचे नाव होते. दोघांचीही पहिली भेट ही इंग्लंडमध्ये झाली. तेव्हापासून म्हणजे 2019 पासून ते दोघं इंग्लंडमध्येच (Sanchi and Edward Love Story) एकत्र होते. आपल्या प्रेमाबद्दल त्यांनी 3 वर्षांनी आपल्या घरच्यांना सांगितले आणि घरच्यांनीही लग्नासाठी होकार दिला. लग्न संभाजीनगरात व्हावं आणि तेही बौद्ध पद्धतीनं अशी मुलीच्या कुटुंबियांची अट होती. ही अट मुलीसाठी फार कठीण होती आणि एडवर्डच्या घरची संस्कृती ही संपुर्णपणे वेगळी होती. परंतु एडवर्डच्या घरचा मोठेपणा इतका की एडवर्डचं आणि सांचीचे लग्न त्यांनी बौद्ध पद्धतीनं करण्यासाठी होकार दिला आणि त्यांचे लग्न हे थाटामाटात संभाजीनगरमध्ये लागले.
या लग्नासाठी एडवर्डच्या कुटुंबाने होकार दिला आणि थेट कुटुंबासह त्यांनी संभाजीनगर गाठलं. त्या दोघांचा बौद्ध पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. यावेळी एडवर्डसह त्याच्या कुटुंबीयांनी सुद्धा सर्व विधीत सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या लग्नात भारतीय वेश परिधान करून ही सगळी मंडळी सहभागी झाली.
जातीपातीच्या भिंती तोडून हे लग्न होत असल्याचा खास आनंदही झाला असल्याचे मुलीच्या वडिलांनी सांगितलं. सांची आता कायमची सातासमुद्रपार राहायला जाणार याचं दुःख आहे मात्र, मुलगी एका चांगल्या कुटुंबात गेली याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया यावेळेस रगडे (Ragde Family) कुटुंबियांनी दिली आहे.