अमरावती : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करून खून करण्यात आल्याची घटना अमरावतीत घडली आहे. अर्पिता ठाकरे (वय १७) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. ती शहरातील भारतीय महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षाला शिकत होती. ती आज दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास शिकवणी वर्गातून मैत्रिणीसोबत घराकडे जायला निघाली होती. त्यावेळी तुषार किरण मस्करे (वय 22) या तरुणाने वेष बदलून अर्पितावर चाकूने हल्ला केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गळ्यावर चाकुने वार केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यामध्ये तिची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. परिसरातील नागरिकांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. अर्पिताने अखेरचा श्वास घेताच नातेवाईकांना रुग्णालयात आक्रोश केला. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. त्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.


दरम्यान परिसरातील नागरिकांनी हल्लेखोर तरुणाला पकडून चोप दिला. तसेच त्याला राजपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी राजपेठ पोलीस अधिक तपास करीत आहेत.