Mumbai Crime News:  तो आणि ती मुंबईत आले सुखी संसाराची स्वप्न पाहू लागले. दोघांमध्ये प्रेमाने अंकुर धरला. पण प्रियकराने तो अंकुर एका क्षणात खुडून टाकला. याला कारण ठरलं एक संशय. संशयाचे भूत डोक्यात शिरलं आणि सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात भंगलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई पोलिसांना दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11. 35 मिनिटांनी कुर्ला  मेट्रो स्टेशन ब्रइजखआलई एक निळ्या रंगाची बेवारस बॅग आढळून आली. घटनेचं गांभीर्य लक्षात येताच पोलिसांची एक टीम स्पॉटवर‌ पोहोचली. पोलिसांनी ती बॅग उघडताच धक्का बसला . त्या निळ्या रंगाच्या बॅगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात असणारा मृतदेह सापडला.  पोलिसांनी तात्काळ या प्रकरणात अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला.


दोन दिवसात खूनी शोधला


या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे देण्यात आला. पोलिसांकडे कोणताही सुगावा नव्हता मात्र पोलिसांनी 8 टीम तयार केल्या. परिसरातील सगळे CCTV तपासले... अनेकांना विचारणा केली... ती निळ्या रंगाची बॅगच आता आरोपी गजा आड घेऊन जाणार होती. पोलिसांना अखेर एक क्लू सापडला. पोलिसांनी थेट गाठलं ठाणे रेल्वे स्टेशन. म्हणतात ना "कानून के हात लंबे होते है" याचा प्रत्यय ठाणे स्टेशनवर आला.  आरोपी ओडिसाला जाण्याच्या तयारीत होता. इतक्यात पोलिसांचा आवाज आला. "अस्कर यु आर अंडर अरेस्ट" 


 वय वर्ष अवघं २२ असणाऱ्या अस्कर मनोज बरला याने अत्यंत थंड डोक्याने प्रेयसीची हत्या केली होती.  पोलिसाने खाक्या दाखवताच आरोपी पोपटा सारखा बोलू लागला. दोघं धारावीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते पण डोक्यात संशय शिरल्याने हत्याकेल्याचं उघड झालंय. अस्करने जी बॅग लग्नाचे कपडे ठेवण्यासाठी घेतली होती त्याच बॅगेत त्याने आपल्या प्रेयसीचा मृतदेह भरला.  प्रेम ही अत्यंत शुद्ध आणि पवित्र बाब पण संशयाची कीड एकदा लागली की त्याची माती झाली म्हणून समजा.