चंद्रपूर : राजकीय वर्तुळातून वाईट बातमी समोर आली आहे. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उद्धवराव शिंगाडे (Uddhavrao Shingade Death) यांचे आज संध्याकाळी 5 वाजता निधन झालंय. ते 75 वर्षांचे होते. उद्धवराव यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. एक अनुभवी लोकप्रतिनिधी गमावल्याची खंत व्यक्त केली जात आहे. (brahmapuri assembly constituency former mla uddhavrao shingade passed away)


उद्धवराव शिंगाडे यांचा राजकीय प्रवास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धवराव शिंगाडे हे 1999 ते 2004 या काळात भाजपच्या तिकीटावर विधानसभेत निवडून गेले होते. आमदार, ग्रामीण भागाशी नाळ कायम असलेला, निष्कलंक आणि प्रसिद्ध कीर्तनकार अशी होती त्यांची ख्याती होती. जनता दल, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. उद्धवराव शिंगाडे यांच्यावर उद्या (5 ऑगस्ट) चिंचोली या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.


दरम्यान बुधवारी 3 ऑगस्टला  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सांगलीच्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचं अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.