Chhagan Bhujbal : ब्राह्मण समाजाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य अन्न नागरी पुरवठामंत्री  छगन भुजबळ यांना चांगलेच महागात पडणार आहे.  छगन भुजबळ यांच्या विरोधात ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. भुजबळ यांना अटक करावी अशी मागणी केली जात आहे. त्यासोबतच आता मंत्रीपद देखील धोक्यात येणार आहे. भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील केली जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुजबळांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी


भुजबळांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. भुजबळांवर कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही महासंघानं दिला आहे. भुजबळांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली होती. त्याविरोधात ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी येवला या भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन निदर्शनं केली तसंच तहसीलदारांना निवेदनंही दिलं आहे.


भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी  


भुजबळ यांनी जाहीर माफी मागावी आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यध्य आनंद दवे यांनी केली आहे. भुजबळांबाबत आठ दिवसांत जर निर्णय झाला नाही, तर मंत्रालयावर मोर्चा काढू अशा इशारा देखील त्यांनी दिला आहे. ही ब्राम्हण द्वेषाची लाट आहे. नेमाडे, कोकाटे हे देखील बोलतात. अटकेपार भगवा झेंडा लावणारे पेशवे आहेत. 


येणारे पिढीचे नाव आम्ही नथुराम ठेऊ, अशी वेळ येऊ देऊ नका.  देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे बाकीचे नेते गप्प का? असा सवाल दवे यांनी उपस्थित केला.  छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज सर्वांचे आदर्श आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी का हात कापतात ? हजारोंचा मोर्चा निघाला तर एक नाही शंभर भुजबळ आपण नेस्तनाबुत करू असा धमकीवजा इशाराही दवे यांनी दिला. 


छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयित ताब्यात


छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयिताला संभाजीनगरमधून ताब्यात घेण्यात आलाय. इंद्रनील विभास कुलकर्णी असं या आरोपीचं नाव आहे. ब्राह्मण समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, तसच शिवीगाळही करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत इंद्रनील कुलकर्णीला अटक केलीय. 
छगन भुजबळ यांचे वादग्रस्त वक्तव्य नेमकं आहे तरी काय?
 ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी ही नावं का असत नाहीत असं विधान छगन भुजबळ यांनी केलं होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे वादंग उठले आहे.