ठाणे : जिल्ह्यात बदलापूरमध्ये उद्यापासून पाव महागणार आहेत. ८ पावांची लादी १५ ऐवजी १८ रुपये करण्यात आली आहे. उत्पादन खर्च वाढल्यामुळे भाव वाढवण्यात आल्याचे कुळगाव बदलापूर बेकरी ओनर्स वेलफेअर असोसिएशनने स्पष्ट केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाव महागल्यामुळे आता शहरात वडापाव, मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत बेकरी मालकांच्या संघटनेने आज बंदही पाळला होता.