Badlapur Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा (Akshay Shinde) काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. अशातच आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.   बदलापूर शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी शाळेचे संस्थापक आणि सचिवाला अखेर अटक करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जत परिसरातून या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही लपून बसले होते. अखेरीस पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या दोघांनी हायकोर्टामध्ये अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला होता. पण हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. ठाणे पोलिसांनी कर्जत परिसरातून दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांनाही उद्या गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करणार आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास करणा-या SIT पथकानं शाळेच्या या ट्रस्टींना फरार घोषित केले होते. 


दरम्यान, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सरकारकडून आयोगाची स्थापना कऱण्यात आलीय..अलहाबाद हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झालीय.. आयोग अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करणार आहे.. राज्य सरकारकडून निवृत्त न्यायामूर्तीचा एक सदस्यी आयोग स्थापन करण्यात आलाय.. आयोग तीन महिन्यात अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणाचा अहवाल सरकारला सादर करणार आहे.. 


बदलापूरमध्ये दोन चिमुरडींवर अत्याचार झाला.. त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता.. संतापलेले बदलापूरकर थेट रेल्वे ट्रॅकवर उतरले होते.. 20 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रानेच नाही तर देशानेही बदलापूरकरांचा हा संताप पाहिला.. मात्र मंगळवारी त्याच बदलापूर रेल्वे स्टेशनवर पेढे वाटले जात होते.. स्टेशनबाहेर फटाके फोडले जात होते... ज्या रेल्वे स्टेशनवर बदलापूरकरांच्या संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला होता.