Raj Thackeray: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या मुंबई दौ-यादरम्यान मनसे भाजप युतीवर विचारमंथनाची शक्यता आहे. अमित शाह एक दिवसांच्या मुंबई दौ-यावर येत आहेत. या दौ-यात अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट होणार का याची उत्सुकता आहे. मनसे - भाजप - शिंदे गट एकत्र निवडणूक लढणार का यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्यावर शाह हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार आहेत. गेल्या काही दिवसांत राज ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली आहे. तसंच,  भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलीय. त्यामुळे शाहांच्या दौ-यात शिंदे गट - मनसे - भाजप एकत्र येणार का याची उत्सुकता आहे.


  • गणेशोत्सवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा

  • १८ सप्टेंबर पासून राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर

  • संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा




दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे?
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरे मेळाव्याला उपस्थित राहिले तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही असं विधान शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी केलंय. त्यामुळे शिवाजी पार्कवर राज ठाकरेही उपस्थित राहणार का? यावरून नव्या चर्चांना उधाण आलंय.