गाडीच्या बोनेटवर फोटो काढले बसून, हौशी नवरीचा पोलिस शोध घेताय कसून
या नवरीची एकच चर्चा सगळीकडे रंगली आहे.
मुंबई : ही बातमी आहे एका लग्नाची, नवरीच्या हटके अंदाजाची. हौस म्हणून लग्न मंडपात जाताना या नवरीने चक्क गाडीच्या बोनटवर बसून मंगलकार्यात एन्ट्री घेतली आहे. आणि बोनटवर बसून घाटातून लग्नमंडपात जाताना तिने खास व्हिडिओ शूट देखील केलंय. त्यामुळे या नवरीची एकच चर्चा सगळीकडे रंगली आहे.
सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. पुणे सासवड मार्गावरील दिवे घाट येथील हा व्हिडिओ आहे. सासवड जवळील सिध्देश्वर मंगल कार्यालयात या नवरी मुलीचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण या नवरीला अगदी स्टंटबाजी करत लग्नमंडपात हजेरी लावायाची होती.
स्कार्पिओ गाडीच्या बोनटवर बसून प्रवास करणे ही बाब धक्कादायक आणि कायद्याच्या चौकटीत न बसणारी आहे. त्यामुळे सध्या पोलिस या हौशी नवरीचा शोध घेत आहेत. एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे या नवराईने आपला जलवा दाखवला खरा, पण धोकादायक रितीने प्रवास करणे तिला आता महागात पडलं आहे. लग्न कार्य म्हटलं की चर्चा असते ती नवरीच्या लग्नातील पेहरावाची आणि पारंपारिक अंदाजाची,पण या नवरीने मात्र बोनटवर बसून लग्नामंडपात येत साऱ्यांचंच लक्षवेधून घेतलं.ो
अशा प्रकारे बोनटवर हा कायद्याने गुन्हा आहे. आता पोलिस या नवरी मुलीवर आणि तिच्या कुटुंबियांवर कायदेशीर कारवाई करतात का याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.