अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अप्पर वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे शुक्रवार पासून उघडण्याात आले आहेत. धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे वर्धा  नदीच्या आसपास असलेल्या शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे काही गावांचा संपर्कही तुटला आहे. तसेच श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील वर्धा नदीवरील पुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुलावर भलेमोठे खड्डे पडले असून  पुलावरून वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे पुलाची दुरुस्ती कधी होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा पाणी प्रकल्प असलेल्या अप्पर वर्धा धरणाचे १३ ही दरवाजे २ मीटरने शनिवारी उघडण्यात आले होते. 


त्यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला होता. शिवाय अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला जोडणारा कौंडण्यपूर देखील पाण्याखाली गेला होता. त्यातच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने या पुलावरील लोखंडी कठडे अक्षरशः वाहून गेले. आता वर्धा नदीचा पूर ओसरला असून वर्धा जिल्ह्यात जाणारा हा मार्ग ही खुला करण्यात आला आहे.