Ratnagiri Brother Sister News : आई वडिलांच्या भांडणाचा सगळ्यात जास्त परिणाम हा मुलांवर होतो. नवऱ्या बायकोमधील वाद एवढे टोकाला गेले की बायकोने खरं घर सोडले. दोन अल्पवयीन भावंड वडिलांकडेच होते. नाही म्हणतात म्हणतात चार वर्ष लोटली. पण माऊलीची ओढ मुलांच्या मनातून जात नव्हती. आईच्या आठवणीत व्याकूळ झालेल्या या मुलांनी धक्कादायक पाऊल उचलं. घरात कोणालाही न सांगता हे दोघे घराबाहेर पडले आणि आईच्या मायेसाठी तिच्याकडे निघाले. 


अन् न सांगता मुलं घराबाहेर पडली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलं घरात दिसतं नाही पाहून कुटुंबियांनी अख्ख परिसर पालथ घातलं. सर्वत्र या बहीण भावाचा शोध सुरु झाला. आई पुण्यात राहते आणि मुलं वडिलांसोबत लांजा तालुक्यातील वाघण बौद्धवाडीमध्ये राहतात. माऊलीची खूप आठवण आली म्हणून या मुलांनी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. (Brother Sister News minor girl and boy left home go to pune meet mother but damini pathak found them ratnagiri news)


बहीण भाऊ पुण्याचा दिशेने निघाले अन् मग...


बहीण भाऊ पुण्याला जायला निघाले. सोमवारी संध्याकाळी ही भावंड राजापूर एस. टी. डेपो समोर एका बाजूला बसली होती. अचानक त्यांचावर दामिनी पथकाची नजर गेली. दोन अल्पवयीन मुलं शांतपणे एकटीत बसल्याची पाहून त्यांना शंका आली. त्यांनी मुलांची विचारपूस करण्यास सुरु केली. 


तेव्हा मुलांनी सांगितलं की, त्यांची आई चार वर्षांपूर्वी घर सोडून पुण्याला गेली. आम्हाला तिची खूप आठवण येतं आहे. म्हणून आम्ही तिच्याशी संपर्क करुन पुण्याला जात आहोत. त्या मुलांना वडिलांचं नावं विचारलं असताना त्यांनी सांगितलं की, वडील महेंद्र गणपत जाधव हे कोकण रेल्वेत कामाला आहेत. 


आणि पोलिसांच्या फोन आला...


इकडे गावाकडे मुलं दिसतं नाही म्हणून कुटुंब कासावीस झालं होतं. दोघंही मुलं नेमकी गेली कुठे आणि गावात ती कुठे दिसतं नाही. कुटुंब मुलांचा शोध घेत असताना पोलिसांचा फोन आला आणि ते घाबरले. पोलिसांनी मुलं बरी आहेत आणि सापडली आहेत हे सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी वडिलांना बोलावून घेतले. 



मुलांना पोलिसांनी चांगल्या प्रकारे समजवलं आणि वडिलांनाही मुलांच्या संगोपनाबद्दल मार्गदर्शन केलं. त्यानंतर ही बहीण भाव वडिलांसोबत घरी गेली. दरम्यान दामिनी पथकाच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलं सुखरुप घरी परतली म्हणून त्यांचं कौतुक होतं आहे. दामिनी पथकातील महिला पोलीस हवालदार हर्षदा चव्हाण आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल सुषमा स्वामी कामगिरीबद्दल सगळेजण त्यांचं अभिनंदन करत आहेत.