बोकड `अजूबा` चक्क दूध देतो!
आजपर्यंत तुम्ही गाई म्हशी शेळी दूध देताना पाहिलं असेल.. मात्र एखादा बोकड जर दूत देतो म्हंटलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला गोंदिया जिल्ह्यातल्या पिपरटोला गावातील अशा बोकडाची ओळख करून देणार आहोत, जो चक्क दूध देतो.
माधव चंदनकर/ गोंदिया : आजपर्यंत तुम्ही गाई म्हशी शेळी दूध देताना पाहिलं असेल.. मात्र एखादा बोकड जर दूत देतो म्हंटलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला गोंदिया जिल्ह्यातल्या पिपरटोला गावातील अशा बोकडाची ओळख करून देणार आहोत, जो चक्क दूध देतो.
या बोकडाचं नाव आहे... 'अजूबा'. हा चक्क दूध देतो. होय तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे.. हा बोकड चक्क दूध देतोय.. तीन महिन्यांपूर्वी गोंदियातल्या पिपरटोला गावातील कटरे कुटुंबीयांनी तोतापुरी प्रजातीचा हा बोकड विकत घेतला. आणि या अजूब्याचा अजूबा समोर आलाय..त्यामुळे हा बोकड परिसरात चर्चेचा विषय ठरलाय.
मात्र बोकडाच्या या करामतीनंतर पशूवैद्यकीय डॉक्टरांच्या चमूला पाचारण करण्यात आलं. तेव्हा बोकडाला गॅनोकोमोसठीया नामक आजार झालाय आणि त्यामुळे त्याच्या शरीरातील हार्मोन्स बदलले असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
२५ हजार रुपयांत खरेदी केलेल्या या बोकडाला त्याच्या या अद्भूत गुणांमुळे, आता चक्क दीड लाख रुपयांपर्यंत मागणी आली आहे. मात्र या अडीच वर्षांच्या बोकडावर संशोधन करण्यासाठी त्याला दत्तक घेण्याची तयारी पशुसंवर्धन विभागानं दाखवलीय.