बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा-मलकापूर मार्गावर एका पॉलटेक्निक कॉलेज विद्यार्थिनीला एसटी बस पास असून सुद्धा चक्क रात्री बसमधून मध्येच उतरवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ एक्स्प्रेस बसमध्ये पास चालत नाही असं कारण देत या मुलीला खाली उतरवून देण्यात आलं. हा प्रकार फलटण-मलकापूर बसमध्ये घडला असून दुसरी एसटी बस येईपर्यंत विद्यार्थिनी मोताळा बस स्थानकावर एकटी रात्री उभी होती.


या प्रकाराची विद्यार्थिनीने मलकापूर आगारमध्ये जाऊन तक्रार पुस्तिकेमध्ये तक्रार नोंदविली आहे. पण सदर वाहन फलटण आगारातील असल्याने ही तक्रार फलटण आगारात वर्ग केली असल्याचे सांगून मलकापूर बस आगार वाहकावर कारवाई करत नाहीये. सुदैवानं या विद्यार्थिनी सोबत काही घडलं नाही. पण अस काही चुकीचं काही घडलं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं? हा प्रश्न निर्माण होतोय.