महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच निघाला आरोपी
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : महिला विहिरीत पडल्याची माहिती देणारा व्यक्तीच पोलिसाच्या प्राथमिक तपासात आरोपी निघाला असून पोलीसांनी त्याला अटक केले आहे. ही घटना बुलढाणा शहरातील असून सुरेश पवार या इसमाने बेबाबाई बावणे ही महिला विहिरीमध्ये पडल्याची माहिती नातेवाईकांना दिली.
त्यांनतर पोलीस श्वानपथक सह घटनास्थळी विहिरीजवळ दाखल झाले आणि शोध घेतला असता प्राथमिक तपासात सुरेश पवार हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान बेबाबाई बावणे यांना विहिरीतून काढून उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले होते.
मात्र डोक्याला जबर मार लागला असल्याकारणाने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र हा खून का करण्यात आला असावा यामागे काय कारण असावीत याचा शोध आणि कसून चौकशी बुलढाणा पोलीस करीत आहेत.