साहित्य संमेलनाच्या जागेवरूनच वाद
हिवरा आश्रमात संमेलन घेण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं विरोध केला आहे.
बुलडाणा : बुलडाण्याच्या हिवरा आश्रमात साहित्य संमेलनाची जागा निश्चित झाल्याबरोबर वादांची मालिका सुरू झाली आहे. हिवरा आश्रमात संमेलन घेण्यास अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं विरोध केला आहे.
स्वामी विवेकानंदांसारख्या विवेकी योग्याचे नाव वापरणाऱ्या, पण प्रत्यक्षात 'रजनिशांच्या तंबूतील उंट'असणाऱ्या ढोंगी शुकदास महाराजांच्या आश्रमात साहित्य संमेलन घेऊन साहित्य महामंडळ साहित्य रसिक जनतेसमोर कोणता आदर्श ठेऊ इच्छीते. असा प्रश्न अंनिसनं विचारला आहे.