मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : जिल्ह्यातील खेर्डा या जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये 50 वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचार करून तिची हत्या झाली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांच्या ज्युली नावाच्या श्वानाची मोठी मदत झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हैदराबाद आणि उत्तर प्रदेशातील उन्नावमधील अत्याचाराच्या घटनेनं देश ढवळून निघाला असतानाच बुलडाण्यात दिव्यांग महिलेवर अत्याचार करुन हत्या केल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भूजबळ यांनी युद्ध पातळीवरून तपास यंत्रणा कामास लावली.


गुन्हेगाराचा शोध घेतांना कुठलीच ऊणीव ठेवण्यात आली नव्हती. ठसे तज्ञ, फाँरेन्सिक पथकासह श्वान पथकातील ज्युली सुद्धा घटनास्थळी दाखल झाली. ज्युली नावाच्या श्वानाची पोलिसांना मोठी मदत झाली. ज्युली परिसरातील अनेक घरे ओलांडून बरोबर आरोपीच्या घरात घुसली. 30 वर्षीय रितेश गजानन देशमुख याला पकडलं. आरोपीनं गुन्हा कबुल केला.


रितेशचा शोध घेऊन ज्युली थांबली नाही. घटनेनंतर रितेश घरी आला होता, त्याने घडलेली घटना आपल्या पत्नीला सांगितली. पुरावा नष्ठ करण्याच्या हेतुने नितेशच्या अंगावरील कपडे रातोरात धुवून आपल्या घरापासून दूर वाळायला टाकले होते. ते कपडेही ज्युलीने शोधुन दिले. अल्पवधीत मिळालेल्या या यशाने पोलीस यंत्रणा सुखावली. पण त्याचं श्रेय ज्युलीला जातं.