बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील लोणारमध्ये एका व्यापा-यानं शेतक-यांना ३० लाखांचा गंडा घातलाय. योगेश्वर शर्मा असं या व्यापा-याचं नाव असून याबाबत बाजार समितीच्या सचिवांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीये.


अशी केली फसवणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणार तालुक्यातील तसेच मराठवाड्यातील हिंगोली, जालना जिल्ह्यातील अनेक शेतकरी योगेश शर्माकडे माल विक्रीसाठी आणत होते. तीन वर्षांत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करत त्याने शेतमाल खरेदी करवून घेतला. सद्यस्थितीत खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यासाठी काही शेतकऱ्यांना चक्क जानेवारी २०१७ चे धनादेशही दिले. तसेच काहीना हिशोब पट्टी देऊन नंतर पैसे देतो म्हणून सांगितले. शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने व्यवहार केले. मात्र शेतकऱ्यांची शर्मा ने फसवणूक केली. 


पैसे न देता अडत्या फरार 


योगेश शर्माने शेतक-यांकडून घेतलेला माल विकला आणि लाखो रुपये कमवले मात्र शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न देता हा अडत्या फरार झाला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेतक-यांनी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवशंकर तेजनकर तसेच सचिव वायाळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.