नांदेड : यंत्रयुगात तसा बैलगाड्यांचा वापर दिवसेंदिवस कमी होत चाललाय... पण अजुनही अनेक शेतकरी आवर्जुन बैलगाडीचा वापर करतात. नांदेड जिल्ह्यात अशीच एक बैलगाडीची जत्रा प्रसिद्ध आहे.नांदेड जिल्ह्यातली ही केशवगिरी महाराजांची जत्रा. ती प्रसिद्ध आहे बैलगाड्यांची जत्रा म्हणून. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळच्या वसमत जिल्ह्यातल्या केशवगिरी महाराजांनी अर्धापूर तालुक्यातल्या देळुबमध्ये दत्त प्रभुंची उपासना केली आणि याच ठिकाणी सुमारे साडेतीनशे वर्षांपुर्वी जिवंत समाधी घेतली... तेंव्हापासुन ही जत्रा सुरु आहे.



वाडवडिलांपासुन केशवगिरी महाराजांच्या जत्रेत बैलगाडीवरुन जाण्याची प्रथा असल्याने सगळी कुटंबं बैलगाडीनंच या जत्रेला येतात. या जत्रेसाठी जेवणाची शिदोरी घेतली जाते. 


मंदिरात दर्शन आणि प्रसाद घेतल्यानंतर तो प्रसाद नैवैद्य म्हणून आधी बैलांना भरवला जातो... या नेवैद्याने बैल वर्षभर निरोगी राहतो असा विश्वास आहे. जत्रेच्या रुपानं बैलगाड्यांचा वारसा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न होतोय.