CM Eknath Shinde Announcement : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णयांचा  धडका लावला आहे. ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 24000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सणाकरिता 24000 रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी  आनंद योग कुटिर येथे ही घोषणा  केली.  ठाणे महानगरपालिकेने सन  2022-23 साठी 21500 रुपये  इतके सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात 2500 हजार रूपयांची वाढ करून 24000 देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.


पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना  23 हजार रुपये सानुग्रह अनुदान 


पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचारी आणि  अधिका-यांना दिवाळी बोनस मिळणारेय... 8.33% बोनस तसेच 23 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणारेय....कर्मचारी आणि अधिका-यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा होणारेय.....महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने त्याबाबतचं परिपत्रक काढलंय..


नाशिक मनपाच्या कर्मचा-यांना 20 हजार बोनस जाहीर 


नाशिक मनपाच्या कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी आहे ....दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांना  20 हजार बोनस जाहीर झालाय... तसेच मानधनावर असलेल्या विविध विभागात काम करणाऱ्या 550 कर्मचाऱ्यांना 10 हजार दिवाळी बोनस जाहीर झालाय..   कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाल्यानं पालिकेच्या तिजोरीवर 9 कोटी 55 लाखांचा बोजा पडणार आहे....  ठाकरे पक्षाच्या संघटनेने मागणी केल्यानंतर,   महापालिका कर्मचा-यांना  दिवाळीनिमित्त अनुदान जाहीर केलंय.. 


रेल्वे कर्मचा-यांना 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणारेय....रेल्वे कर्मचा-यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेत केंद्रीय मंत्रिमंडळाने 2 हजार 28 कोटी रुपयांचा बोनस मंजुर केलाय...एकूण 11 लाख 72 हजार 240 रेल्वे कर्मचा-यांना बोनस मिळणारेय.