नाशिक : शहरात टीव्हीचा स्फोट होऊन फ्रिजसह अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झालीत. सध्या राज्यात उष्णतेची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे तापमानाचा परिणाम झाल्याने टीव्हीचा स्फोट झाल्याचे प्राथमिक माहिती देण्यात आली. शहरातील विनयनगर येथील ही घटना घडली. या स्फोटात मोठे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमधील एका फ्लॅटमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा स्फोट झाल्याने एकच धावपळ उडाली. उष्णतेमुळे टीव्हीचा स्फोट झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या स्फोटामुळे फ्लॅटला आग लागली. त्यामुळे टीव्हीसह फ्रिज आणि घरातील इतर साधने जाळून खाक झालीत. ही घटना विनयनगर दमयंती सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील घटली. दरम्यान, आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळविले आहे.