Accident News: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 1 प्रवासी ठार झाला असून 18 प्रवासी जखमी आहेत. घाटातील गणपती पॉईंटजवळ हा अपघात झाला आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या वतीने मदतकार्य करण्यात आलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सप्तशृंगी गडावरील अवघड वळण असणाऱ्या गणपती पॉईंटजवळ ही बस दरीत कोसळली आहे. बस जवळपास 100 ते 150 फूट खाली कोसळली आहे. बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांपैकी एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. 18 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आलं होतं. दरम्यान, जखमींना वणी आणि नांदोरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. 


छगन भुजबळांचं ट्वीट


"नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी घाटात वणी गड उतरत असताना एसटी बसचा अपघात झाला असून यात 18 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत महिलेला भावपूर्ण श्रद्धांजली! मृताच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून अपघातग्रस्तांवर तातडीने उपचाराबाबत सूचना दिल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना!," असं ट्वीट छगन भुजबळ यांनी केलं आहे. 



समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आणि ट्रकची जोरदार धडक


दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात ट्रॅव्हल्स समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. यातील 9 जणांवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही खुराणा ट्रॅव्हल्सची बस होती. समृद्धी महामार्गावर गेट नंबर 16 जवळ हा अपघात झाला आहे.