कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मोहरमच्या मिरवणुकीत बस घुसून २ जण ठार झाले आहेत, तर २२ जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली, मात्र दुसऱ्या दिवशी कोल्हापूर महापालिका वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांनी बंद पाळला होता, कारण या घटनेनंतर जमावाने ३ शहर बसची तोडफोड केली होती.


 बस पेटवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला, पण पोलीस पोहोचल्याने ही घटना टळली, शहरातील पापाची तिकटी परिसरात ही घटना घडली. सकाळी काही वेळेनंतर शहर बस वाहतूक सुरू करण्यात यश येईल असं सांगण्यात येत आहे. बसचा ब्रेकफेल झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती होती.