Bus Fire : पुण्यानंतर नाशिकमध्ये आग लागल्यानंतर शिवशाही बसचा कोळसा
Bus Fire : शिवशाही बसमधून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. दोन दिवसात दोन गाड्यांना आग लागली.
Nashik Bus Fire : नाशिक : राज्यात शिवशाही बसमधून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. कारण गेल्या दोन दिवसात दोन घटना घटल्यात. आज नाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही बसला आग लागली. तर काल पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी शिवशाहीनं पेट घेतला होता. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसचे ऑडिट करण्याची मागणी होत आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर तालुक्यातील माळवाडी परिसरात शिवशाही बसला आग लागली. आज बुधवार सकाळी शिवशाही बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्यांने त्वरित बस थांबून आतील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. नाशिकमध्ये बस जळण्याचा वाढत्या घटनाने चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये खासगी बस जळून नुकताच 12 जणांचा मृत्यू झाला होता.
पुण्यात यवतमाळ ते चिंचवड या शिवशाही बसला येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात आग लागली होती. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाने बस बाजूला घेऊन उभी केली. आणि सतर्कता दाखवत चालकाने तात्काळ सर्व 42 प्रवाशांना खाली उतरवले आणि त्यानंतर लगेचच बसने पेट घेतला. अग्निशमन दलाने वेळेत घटनास्थळी दाखल होऊन बसची आग विझवली.
दरम्यान, कालच पुण्यात कोंढवा परिसरात एका हॉटेलला आग लागली होती. रूफ टॉप हॉटेल या आगीत जळून भस्मसात झालं. लुल्लानगर चौकात मार्व्हल व्हिस्टा बिल्डींगमध्ये एका हॉटेलला ही आग लागलीय. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणलीय.
शिवशाही बसच्या आगीचा भडका उडला. बघता बघता आगीचे रुद्र रुप धारण केले होते की परिसरात धुर आणि आगीचे लोट दिसून येत होते. या मार्गावरून जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.