प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगड पोलिस(Raigad police force ) दलात भरतीसाठी(Police Bharti) आलेले उमेदवार डोपिंगच्या(doping trap) विळख्यात अडकले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.  दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स, इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडल्या आहेत.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिस दलात भरतीसाठी आलेल्या उमेदवारांकडे उत्तेजक द्रव्य असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अलिबाग जवळील वरसोली येथील उमेदवार रहात असलेल्या कॉटेज वर धाड टाकली. तेव्हा त्यांच्याकडे 2 इंजेक्शन्स , तीन वायल्स ( औषधांची कुपी), 44 सुया, काही टॅबलेटस, कॅप्सुल आढळल्या. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले आहे. औषधांच्या बॉटल्स वरील लेबल काढून टाकण्यात आले आहे.


ही औषधे घेतल्यास मैदानी चाचणीत फायदा होतो अशी कबुली या उमेदवारांनी दिली आहे.  दोन पैकी एका उमेदवाराची काल मैदानी चाचणी झाली आहे.  तिघांपैकी दोघे पुण्याचे तर एकजण नगर जिल्ह्यातील आहे. तिघांच्याही रक्ताचे नमुने आणि जप्त केलेली औषधे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. तूर्तास तिघांनाही सोडून देण्यात आले आहे.  तपासणी अहवाल आल्यानंतर निष्कर्ष पाहून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.


उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेऊन पोलिस भरतीची चाचणी देण्यास मनाई


उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तू, पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेस सामोरे जाऊ नये. प्रामाणिक प्रयत्न करावेत असे आवाहन करतानाच जे उमेदवार गैरप्रकार करताना आढळून येतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल , असे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले.


काय आहे ‘डोपिंग’ चाचणी?


अनेकदा खेळाडू स्पर्धा जिंकण्यासाठी आपल्यात असलेली शारीरिक क्षमता जलदगतीने वाढविण्यासाठी उत्तेजक द्रव असलेले इंजेक्शन तसेच कॅप्स्युल घेतात. क्रीडा क्षेत्रात स्टेरॉईड्‌स, स्टिम्युलंट्‌स, नार्कोटिक्स, डायुरेटिक्‍स, पेप्टाईड हार्मोन्स आणि ब्लड अशा प्रकारे डोपिंग केले जाते.  


औरंगाबादमधील पोलिस भरतीत 39 जागांसाठी तब्बल 5 हजार पेक्षा जास्त अर्ज 


औरंगाबादमधील पोलिस भरतीत 39 जागांसाठी तब्बल 5 हजार पेक्षा जास्त उमेद्वारांनी अर्ज केले.  विशेष म्हणजे या पोलीस शिपाई  
पदाच्या भरतीसाठी डॉक्टर (Doctor), इंजिनीअर (Engineer), अगदी एमबीए (MBA) झालेले अनेक उच्च शितक्षित तरुणही सहभागी झाले होते.