नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यात एका शालेय विद्यार्थ्याचं अपहण करण्यात आल्याची घटना समोर आली. अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करुन खंडणी मागितली. पण पोलिसांच्या सजगतेमुळे काही तासातच अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि विदार्थ्यांची सुखरुप सुटका झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
स्वयंम गादिया' असं अपहरण करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. 10 वीच्या परीक्षा सुरु असल्याने स्वयंमला शाळेत येण्या-जाण्यासाठी त्याच्या पालकांनी आपल्या कारवर एका ड्रायव्हरची नेमणूक केली. स्वयंम परीक्षेसाठी शाळेत गेला होता. पण परीक्षेची वेळ संपूनही स्वयं घरी न आल्यानं त्याचं कुटुंबीय घाबरलं. 


त्यांनी कारचालकाला फोन करुन स्वयंमची विचारणा केली. यावेळी त्याने स्वयंमचं अपहरण झाल्याची माहिती दिली. अपहरणकर्त्यांनी चार कोटी रुपयांची मागणी केल्याचंही त्याने सांगितलं. कुटुंबियांनी तात्काळ जालना पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.


यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं वेगानं फिरवत सर्वत्र नाकाबंदी केली.या नाकाबंदी दरम्यान अंबड तालुक्यातील शहापूर येथे स्वयंच्याच कारचालकाने त्याचे अपहरण केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी अपहरण झालेल्या विद्यार्थ्याची सुटका करत करचालकाला ताब्यात घेतलं असून ईतर आरोपींचा शोध पोलीस घेतायत.